१० सुपर कुल फूड्स

मार्च च्या पहिला आठवड्यात मुंबईतले वाढलेले उष्णतामान हे येत्या महिन्यात
अपेक्षित तीव्र उन्हाळ्याची झलक देवून गेले. अश्या उष्ण वातावरणात आपल्या
आरोग्याला जपणे खूप आवश्यक असते. फक्त टोपी, गॉगल, सन स्क्रीन, समर कोट आणि
पाण्याच्या बाटली ने काम होत नसतं. उन्हाळ्याच्या त्रासापासून आपल्या आरोग्याला
जपण्यासाठी आपण रोजच्या आहाराकडे पण लक्ष द्यायला हवे. इथे अश्याच १० फूड्स
ची यादी आणि त्याचे महत्व दिले आहे. एक सोपा निर्देश म्हणजे रोज ह्यातल्या
किमान ६ पदार्थांचा आहारात समावेश केला तर तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास नक्कीच
होणार नाही.

१ नारळ पाणी: हे सर्वोत्कृष्ट प्राकृतिक कॉल्ड ड्रिंक आहे. हे पूर्ण पणे
जंतुरहित तर आहेच पण त्याच बरोबर ह्यातील पोटॅशियम आणि क्लोराईड मुळे
शरीरातल्या द्रव्याचे प्रमाण संतुलित राहते.
२. खरबूज आणि टरबूज : हि फळं खाऊन आपली तहान तर भागतेच पण शिवाय ह्यातून भरपूर
फायबर, लोह तत्व, जीवनसत्व अ ब क आणि ई पण मिळतात. सिझनल फळं असल्यामुळे ती
स्वस्त ही असतात.
३. काकडी: हवी तेवढी खावी. कारण आपल्याला पाणी फक्त द्रव्य रूपात नाही तर
खाण्याच्या पदार्थातून पण मिळायला हवे. उन्हाळ्यात काकडी हि एक लो कॅल पण
पौष्टिक असा पदार्थ आहे. काकडीची कोशिंबीर, रायतं, रस, सूप, सलाड हे समर डायेट
मधे एकदम बेस्ट!
४. कैरी: मुद्दामच कैरी लिहिलं आहे. कारण आंबा तर सगळेच खातात, पण रसना आणि
गेटोरेड च्या जमान्यात, कैरी च्या पन्ह्याला विसरून चालणार नाही. उन्हातून
आल्यावर पन्ह प्यायल्यावर उष्णतेचा त्रास होत नाही. शिवाय एक टेस्टी ड्रिंक पण
मिळते.
५. ताक/दही: लस्सी, ताक, दही ह्या सारखे पदार्थ रोजच्या आहारात असलेच पाहिजेत,
खास करून उन्हाळ्यात. ह्यातून तुम्हाला कॅल्शियम आणि प्रोटीन तर मिळतेच पण
शिवाय प्रतिकार शक्ती वाढवणारे उपयोगी बेक्टेरिया पण मिळतात. घरी केलेली लस्सी
जरूर प्या पण बाहेर उघड्यावर मिळणाऱ्या लस्सी पासून दूर रहा कारण त्याने
तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं.
६. कोकम: रोजच्या स्वयंपाकात कोकमाचा वापर वाढवा. सोल कधी, कोकम सरबत, सार असे
पदार्थ उष्णते पासून आपले रक्षण करतात. शिवाय शरीराला आवश्यक
असे अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट पण ह्यात असतात.
७. लिंबू: लिम्बात असलेले जीवन सत्व क आणि सोडियम शरीरात द्रव्य साठवून ठेवायला
मदत करतात. जर कुणाला उन्हाळी चा त्रास होत असेल तर त्यांनी पाण्यात लिंबू आणि
मध घालून सकाळ संध्याकाळ प्यायला तर आराम मिळतो.
८. अननस: ह्या फळात पाणी, जीवनसत्व क, लोह तत्व, सोडियम, पोटॅशियम आणि इतर
उपयोगी खनिज तत्व असल्या मुळे हे एक आयडियल फळ आहे. हे नुसताच खा किंवा ह्याचा
घरी केलेला ज्यूस न गाळता प्या.
९. आवळा: जीवन सत्व क चा राजा म्हणजे आवळा. आवळ्याचे सरबत, मोरंबा, छुंदा,
लोणचं, चटणी, मोरावळा किंवा साधा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेला आवळा-
कुठल्याही स्वरूपात आवळ्याचा समावेश करा.
१०. टोमाटो आणि पाले भाज्या: ह्यात पाण्याचे प्रमाण जास्त असून ह्याचा रोजच्या
स्वयंपाकात वापर करता येतो म्हणून ह्याचे महत्व. फक्त एक महत्वाची बाब म्हणजे-
ह्या भाज्यांना परतून शिजवलं तर ह्यातील पाणी निघून जातं. म्हणून शक्य तोवर
ह्याची पातळ भाजी, सार, सूप असे पदार्थ करावेत.

हे करा:
– ह्या शिवाय इतर सर्व फळं आणि भाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे.
– दिवसातून कमीत कमी २ लिटर पाणी आणि मग बाकी द्रव्य असे उन्हाळ्याच्या दिवसात
पाळावे.
– सकाळ संध्याकाळ मध पाणी प्यावे म्हणजे उन्हाळी चा त्रास होत नाही.
– कायम आपल्याबरोबर एक छोटी का होई ना, पाण्याची बाटली ठेवावी.
– थंड गार दूध पण एक उत्कृष्ट प्येय असते.

हे करू नका:
– बाहेरून आल्या आल्या फ्रीज चे गार पाणी पिणे.
– उघड्यावर विकत मिळणारे पदार्थ आणि प्येय टाळणे. त्याने रोग राई पसरते. खास
करून बर्फाचा गोळा, उसाचा रस, फ्रुट ज्यूस, जलजीरा इ. बाहेर पिऊ नये.
– सोफ्ट ड्रिंक जास्त प्यायला तर अ‍ॅसिडिटी, जळजळ, पित्त असे त्रास होऊ शकतात.
– विकतचे फ्रुट जूस, आईस क्रीम खाऊन कॅलोरी वाढवण्या पेक्षा घरी केलेले लस्सी,
मठ्ठा घ्या.

About these ads

About Amita

Nutritionist, Foodie, New mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s