चिकन रोगनजोश

चिकन रोगनजोश

चिकन रोगनजोश

चिकन रोगनजोश

सामग्री:

१/२ किलो चिकन
१ छोटा चमचा लसूण पेस्ट
३ मोठे चमचे दही
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
२ मोठे चमचे काश्मिरी लाल मिरची पूड
मीठ चवीनुसार

मसाला:
१ कांदा
८ लसूण पाकळ्या
१ सुकी लाल मिरची
(कांदा, लसुन आणि मिरची ची पेस्ट करून घ्यावी)

१ मोठा चमचा तेल
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
१ छोटा चमचा बडीशेप पूड
१ छोटा चमचा गरम मसाला पावडर
१ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पूड
अख्खा मसाला –
१ छोटा चमचा जिरे
१ छोटा चमचा काळी मिरी
१ छोटा चमचा लवंग
१ इंच दालचिनी चा तुकडा
३ हिरवी वेलची
१ तेज पत्ता

कृती:

– चिकन ला दही, लसुन पेस्ट, धने जिरे पूड, मिरची पावडर आणि मीठ चांगले चोळून, अर्धा तास फ्रीज मध्ये मुरत थेववे.
– एका भांड्यात तेल गरम करून त्यात चिकन लालसर होई पर्यंत परतून घ्यावे. चिकन दुसऱ्या भांड्यात काढून ठेवून, उरलेल्या तेलात अक्खा (खडा ) मसाला थोडा परतून घ्यावा. मग त्यात कांदा लसुन पेस्ट परतावी आणि त्यावर बाकी मसाले पूड घालावे.
– सर्व मसाल्याला तेल सुटलं कि मग त्यात चिकन आणि १ वाटी पाणी घालून, झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवावे. गरज वाटल्यास थोडं अजून पाणी घालावे.
– तुमच्या आवडीनुसार, रस्सा दाट किंवा पातळ ठेवू शक्ता.
– गरम गरम नान, फुलके किंवा पूलाव सोबत फस्त करावे!

Advertisements
Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

केरळ स्टाईल व्हेजिटेबल स्ट्यू

veggie stew

सामग्री:

१ गाजर, फोडी
१ बटाटा, फोडी
१/२ वाटी हिरवे मटार
१ छोटा कांदा, बारीक चिरलेला
५-६ करी पत्ता
२ हिरव्या मिरच्या, मधून चिरा दिलेल्या
१ चमचा आलं लसूण पेस्ट
१ वेलची
२ लवंगा
१/२ इंच दालचिनी चा तुकडा
३-४ काळे मिरे
१ चमचा तेल
२०० मी लि नारळाचे दाट दूध
मीठ स्वादानुसार

कृती:

– एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मिरची, करी पत्ता, आलं लसूण पेस्ट आणि लवंग, दालचिनी, मिरे , वेलची घालून थोडं तडतडल कि मग त्यात कांदा घाला. कांदा मऊसर झाला कि मग बटाटा, गजर आणि मटार घालून झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्या.
– भाज्या शिजल्या कि त्यात नारळाचे दूध आणि मीठ घालून एक उकळी आणा. गरम गरम अप्पम किंवा भात बरोबर सर्व्ह करा.
– अश्याच पद्धतीने चिकन आणि मटण स्ट्यू पण करता येते.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

एगलेस होलव्हीट पॅनकेक

eggless wholewheat pancakes

नवीन वर्षातला नवीन प्रयत्न आहे, अंड युक्त पदार्थांचे अंड रहित पर्याय/ पाक्रु शोधून काढायच्या. ही पॅनकेक ची कृती मला, सई खांडेकर – माझी ब्लॉगर मैत्रीण, हिच्या ब्लोग वर सापडली.

सामग्री:
१ कप गव्हाचे पीठ
१ कप रवा
३/४ कप साखर
१ चमचा खायचा सोडा
१ चिमुट मीठ
२ कप दूध
१ मोठा चमचा तूप

कृती:

– सर्व सामग्री एकत्र करा. गुठळ्या राहता कामा नाही.
– एक नॉन – स्टिक तवा थोडा गरम करून त्यावर एक डावभर मिश्रण ओतून थोडं गोलाकार पसरवा. आच मंद ठेवावी.
– पॅनकेक ला सायीड ने एक दोन थेंब तूप सोडावे. झाकण ठेवून, वर थोडी जाळी पडली कि उलटवून खरपूस भाजून घ्यावे.
– हे पॅनकेक गरम गरम लोण्याच्या (छोट्या) गोळ्या बरोबर किंवा मध, मेपल सिरप बरोबर फस्त करावे.

Warning: No one can eat just one 🙂

Posted in Uncategorized | १ प्रतिक्रिया

चेरी टोमॅटो सलाड विथ थाई चिली ड्रेसींग

cherry tomato salad

साहित्यः

२५० ग्रॅम मिक्स सलाड पाने (लेट्युस, रोमैन, रॉकेट, पार्स्ले इ.)

१ सफरचंद, फोडी केलेलं

१ वाटी चेरी टोमेटो

१ क्यूब प्रोसेस्ड चीज किंवा १०० ग्रॅम पनीर , छोटे तुकडे

थाई चिली ड्रेसींगसाठी साहित्यः

१ टीस्पून लिंबाचा रस
२ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल

१ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर

१ टेबलस्पून चिली फ्लेक्स

१ टेबलस्पून साखर

५ पाकळ्या लसूण, सोलून बारीक चिरलेल्या

मीठ व मिरपूड चवीनुसार

कृती :

ड्रेसिंग च्या सर्व सामग्री ला एका छोट्या काचेच्या बाटलीत (उ.दा. जॅम ची बाटली) घालून, एकजीव होईपर्यंत हलवावे. सलाड लीव्ह्स, सफरचंद, चेरी टोमेटो व चीज ला एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यावर थोडा मीठ व मिरपूड घालावे मग त्यावर थाई चिली ड्रेसींग ओता व हलक्या हाताने मिक्स करावे. लगेच सर्व्ह करावे.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

झटपट चॉकलेट मफिन्स

पुन्हा एकदा ह्या ब्लॉग कडे वळायचे ठरवले आहे. आता आधी सारखे वरचेवर पोस्ट करता येण अवघड दिसतंय पण प्रयत्न प्रामाणिक असेल. अवघड का? अहो, ११ महिन्याचा आमचा ‘राजस’ काही वेळ देईल तर नं! असो. आता पटकन मफिन्स करून बघा पाहू.

सामग्री:
१ १/४ कप मैदा
१/२ कप पिठी साखर
१ अंड
५० ग्राम वितळलेलं लोणी (मी अमूल बटर वापरलं )
१/४ कप दूध
१ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून व्हेनिला इसेन्स
३ मोठे चमचे चॉकलेट सिरप (हर्शीस)

कृती:

– ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस ला प्री-हिट करून घ्या.
– एका माफीन ट्रे मधे पेपर लायनर ठेऊन घ्या.
– एका मोठ्या भांड्यात, मैदा, साखर, बेकिंग पावडर एकत्र करून घ्या. दुसऱ्या एका छोट्या भांड्यात अंड, दूध, बटर, चॉकलेट सिरप आणि इसेन्स फेटून घ्या. मग हे ओलं मिश्रण त्या कोरड्या मैद्याच्या मिश्रणात घालून त्याला एकजीव करा. खूप वेळ फेतात बसू नका, नाहीतर मफिन्स कोरडे होतील.
– मिश्रण ट्रे मधल्या पेपर कप मध्ये घालून (थोडी जागा बाकी ठेवावी, कारण मफिन्स फुगतात) ओव्हन मध्ये २० मिनिट बेक करा. गार झाल्यावर, हव असल्यास आयसिंग करा.

आयसिंग साठी:
२ मोठे चमचे जाडी साय
३ मोठे चमचे न्युटेला चॉकलेट स्प्रेड
१ टी स्पून दूध
५ मोठे चमचे आयसिंग शुगर (पिठी साखर वापरली तरी चालते, फक्त त्याने आयसिंग छान स्मूथ होणार नाही)
– आयसिंग च्या सर्व सामग्रीला नीट कालवून फेटून घ्या, गुठळ्या राहायला नकोत. मफिन्स तयार होऊन, गार झाल्यावर त्यावर हे आयसिंग लावावे.

Posted in Uncategorized | १ प्रतिक्रिया

‘खाऊ का?’ चे अनुभव

‘खाऊ का?’ ह्या सत्राचा आज अंतिम लेख कुठल्या विषयावर लिहायचा हा मोठा प्रश्न पडला होता. आधी विचार केला कि आज मधुमेह, अतिरक्तदाब, अस्थमा अश्या कुठल्या विषयावर लिहिते. मग मनात आलं कि हे कुठलेच विकार एकमेकांपासून विभक्त नाहीयेत. मधुमेहाचच बघाल तर त्याचा लठ्ठ्पणा, अतिरक्तदाब, धुम्रपान, स्नायू दुखणे, संधिवात, डोळ्यांचे विकार, जखम भरून न येणे, अर्धांगवात ई. बऱ्याच विकारांशी संबंध असतो. असं असताना, आज मांडलेल्या प्रश्नांचा पुढच्या लेखात मला समाधान करता येणार नसल्यामुळे मग ठरवलं कि आज तुम्ही वाचकांनी मला ईमेलद्वारे वारंवार विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आज देऊया.

मला सगळ्यात जास्त अश्या प्रकारची ईमेल येतात – ‘मी तुमचा ‘सामना’ मधे लेख वाचतो/वाचते. मी स्त्री/पुरुष, वय: ___, उंची: ____. मला डाएट सांगा.’ आता, फक्त एवढीच माहिती सांगून डाएट मागणं म्हणजे एखाद्या डॉक्टर ला एवढंच सांगून त्याच्याकडे ‘आता मला औषध द्या’ असं म्हणण्या सारखं असतं. आहो, डाएट कशासाठी हवंय, काय विकार आहे, तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयी काय आहेत, व्यायाम किती (किंवा किती नाही!), व्यवसाय काय, घरचं जेवता कि बाहेरचं, शाकाहारी/ मांसाहारी ई. बरीच एवढी सगळी माहिती लागते. माझ्या कुठल्याही क्लायन्ट ची पहिली भेट (मुलाखत) कमीतकमी एक तास चालते. कारण मी जो सल्ला देणार त्याचा त्यांच्या रोजच्या जीवनातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि आवडीच्या विषयावर परिणाम होणार असतो. तर, तुम्ही पण मला जरूर ईमेल पाठवा आणि मी सगळ्यांचं उत्तर पण देईन पण फक्त हे लक्षात घ्या कि डाएट सांगायला मला काय काय माहिती लागेल. आणि हो, ह्यात ही बरीच मंडळी ‘फुकट ते पौष्टिक’ मानून बसलेले असतात-तो विषय तर आणि निराळा. असो.

दुसरं सातत्याने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘तुम्ही पारंपारिक जेवण जेवा असं म्हणता, पण ते नक्की काय असतं?’ ह्या प्रश्नाचं सगळ्यांना अनुकूळ असं एक उत्तरच नाहीये मुळी. शाळेत असताना तुम्ही डबा न्यायचात? त्यात कुठल्याही दोन घरची बटाटा भाजी एका पद्धतीने बनवलेली किंवा एका चवीची असायची का? कोणी नारळ घालणार, कोणी कांदा टोमाटो, कोणी नुसती परतून करणार तर कोणी रस्सा भाजी. एवढे वेगळे प्रकार आपल्या मराठी घरांमध्येच असतात. तर मग, डोश्यात घालतात त्या बटाटा भाजी चा तर विषयच वेगळा. तुमच्या साठी उपयुक्त पारंपारिक जेवण म्हणजे जे खाऊन तुमचे आई वडील मोठे झाले ते. पण एक लक्षात घ्या कि जेवढ्या पोळ्या किंवा भात तुमचे वडील खायचे तेवढंच तुम्ही खाता कामा नाही कारण तेवढे परिश्रम आणि अंगमेहनत आता आपण घेत नाही. तसंच मिष्टान्नाच पण असतं- पूर्वी जे चकली लाडू चिवडा करंजी फक्त सणासुदीला होत होते ते आता वरचेवर घरी केलं/आणलं जातं आणि बेहिशोब खाललं जातं. तसं न करता, पूर्वी च्या पद्धती प्रमाणेच हे पदार्थ त्या त्या सणालाच खालले पाहिजेत.

दमणूक म्हणजे व्यायाम का? नाही. नुसतं डाएट करून वजन कमी करता येतं का? येतं, पण मी तसं करायला कधीच सांगत नाही. कारण व्यायाम हा रोजच्या जेवणा एवढाच महत्वाचा असतो. व्यायामाला सुट्टी देऊन चालत नाही. आणि हो, दिवसभर फिरतीच काम, उभराहून काम, घरकाम ह्यात जरी खूप वेळ जाऊन दिवसाच्या शेवटी प्रचंड दमायला होत असेल तरी तो व्यायाम नसतो. त्यामुळे नुसतं डाएट आणि बाकी घरकाम किंवा बैठी नोकरी करून वजन कमी होण्याची किंवा परिश्रमाने कमी केलेले वजन टिकून राहण्याची अपेक्षा ठेवू नये.

आणि हो, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे उपासमार न करून घेणे. अति जेवण झाल्यावर, संध्याकाळच्या पार्टी च्या आधी दिवसभर उपाशी राहणे, मधुमेही व्यक्तींनी ‘आज गोड खाणं झालंय तर आता पुढचे तीन दिवस कमी जेवणे’ असे सर्व प्रकार तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. चांगल्या आरोग्यासाठी, आहार आणि व्यायाम हे रोजच्या रोज सांभाळावं लागतं; त्यात हप्तेवारी चालत नाही.

चला तर मग, आता निरोप घेते. असंच आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, स्वस्थ खा स्वस्थ रहा!

Posted in Uncategorized | 4 प्रतिक्रिया

जेव्हा मी यो-यो होते

आजवर तुम्ही अश्या किती लोकांना बघितलंय कि जे, स्लिमिंग सेंटर, जिम किंवा फॅड डाएट करत असतात तोवर त्यांचे वजन कमी होत राहते आणि मग जसं ते तो उपक्रम बंद करतात तसं पूर्वीपेक्षा पण जास्त वजन वाढलेले असते? किमान एक तरी असे उदाहरण तुमच्या समोर असेलच. माझे पण असेच काही तरी झाले होते. वयाच्या १६ व्या वर्षी माझे वजन ५० किलो होते (उंची ५ फूट ३ इंच). नुकतीच आजारपणातून उठल्या मुळे, माझ्या आई चे सगळे लक्ष मला जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ (तिच्या मतानुसार) खायला घालण्या कडे होते. मुळात खाण्याची आवड असल्याकारणाने मला पण ‘लगे हातो’ समोसा, कचोरी, चायनीज, पिझ्झा (मला तेव्हा बहुदा ‘विकतचं ते पौष्टिक’ असं वाटत असावं!) असे पदार्थ खायला निमित्त मिळत होते. २० वर्षाची होईपर्यंत आधी छान गोबरे गोबरे गाल असलेली मुलगी म्हणून खपत असलेली मी, गुडगुडीत (जाड) झाले असून माझे वजन ६५ किलो होते. कॉलेज ला गेल्या वर माझ्या लक्षात आलं कि मला वजन कमी करायला हवंय. तर मग मी उपाशी राहून वजन कमी केले, खूप नाही पण ५ किलो. त्या काळात, मी न्युट्रिशन चा अभ्यास तर करत होते पण स्वताला पण तेच लागू होतं हे माझ्या लक्षात आलं नव्हतं, असं आता मी म्हणू शकते. आणि एका वर्षाने माझे परत वजन वाढलेले होते (६७ किलो), तेव्हा लक्षात आलं कि मी पण ‘यो-यो सिंड्रोम’ मधे अडकले होते.

आपण डाएट करतो म्हणजे आहारातल्या कॅलोरीस कमी करतो. अचानक जेव्हा शरीराला मिळणाऱ्या कॅलोरीस कमी होतात तेव्हा सुरवातीला भराभर वजन कमी होतं. पण जोवर आपण डाएट करणं थांबवतो, तोवर आपले शरीर ‘हंगर मोड’ मधे जातं. शिवाय, आहार कमी झाला कि आपली ‘बेझल मेटाबोलिक रेट’ (BMR) पण मंदावते. अश्या वेळी, डाएटिंग बंद केल्या वर जेव्हा आपण परत आधीची आपली आहार प्रणाली सुरु करतो तेव्हा आपले शरीर ह्या कॅलोरीस ची अत्याधिक प्रमाणात साठवणी सुरु करतं. शिवाय मेटाबोलिक रेट पण कमी झाल्याने, आहारातल्या कॅलोरीस वापरल्या जाण्याची प्रक्रिया पण मंदावते. हवं तेवढं वजन कमी झाल्यावर आपण आधी करत असलेला व्यायाम पण थांबवतो. परिणाम: डाएट सुरु करण्या आधीच्या वजना पेक्षा पण जास्त वजन झालेले असते.

असं कायम डाएट आणि व्यायाम चालू आणि बंद करून जो ‘वजन कमी करणे आणि परत वाढणे’ हा प्रकार होतो, आणि त्या मुळे मंदावलेली बेझल मेटाबोलिक रेट- ह्याला ‘यो यो सिंड्रोम’ असं म्हणतात. आणि एक महत्व ची बाब म्हणजे- डाएट ओंन ऑफ करणाऱ्या लोकांच्या वजनाचा पण एक ‘सेट पोइन्ट’ येतो. हा ‘सेट पोइन्ट’ म्हणजे, डाएटिंग सुरु केल्यावर वजन एका विशिष्ट आकड्यावर अडकणे. उ.दा. ७० किलो वजन असलेल्या वारंवार डाएटिंग करणाऱ्या बाई चे वजन काही केल्या ६६ किलो पेक्षा कमी न होणे. हा पोइन्ट कायम स्वरूपी नसतो, पण ज्यांना डाएट करून लगेच परिणाम बघायची घाई असते, त्यांना सेट पोइन्ट ओलांडणं आवघड जातं. ह्यावर उपाय म्हणजे, निराश न होता डाएट आणि व्यायाम करत राहणे. जरा जास्त दिवसांनी का होईना, सेट पोइन्ट ला मात मिळते.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा