फेत्तुचीन मारीनारा (पास्ता)

 

पास्ता म्हंटल कि कायम ‘यमी’ असे उदगार कानावर पडतात. पण आमची आई, पास्ता करू न आई, असं आम्ही कितीही केविलवाणे चेहरे करून सांगितलं तरी म्हणायची ‘काय ते मेले मैदे, पोटात चिकटून बसतात आणि जाडी वाढवतात’. तेव्हा वाटायचं, आमचीच आई आम्हाला कधी ही पास्ता खाऊ देत नाही! पण आता आई नाही असं म्हणत. कारण आता मी साध्या गव्हाच्या पिठाचा म्हणजेच होल व्हीट फ्लोर चा पास्ता बनवते. हल्ली पुण्या मुंबई कडे तर होल व्हीट पास्ता विकत पण मिळतो. जर पास्ता घरी करायचा नसेल, तर विकतचा पास्ता आणून, त्याले शिजवून, टोमाटो किंवा चीज सोस मध्ये घालावा आणि छान सजवून पेश ए खिदमत करावा. ममी भी खुश और टमी भी खुश!

हॉटेल मध्ये पास्ता खाण्या पेक्षा घरीच खाल्लेला चांगला ह्याच कारण असे कि घरी कुठला हि पदार्थ करताना त्यात किती तेल, तूप, चीज घालायचं हे आपल्या हातात असतं.

सामग्री:
२५० ग्राम पास्ता, उकडलेला (उकळत्या पाण्यात पास्ता आणि मीठ घालून त्या पास्ता ला सुरी अथवा फोर्क ने शिजल्याची खात्री करून, गाळून बाजूला ठेवावा)
२५० ग्राम (४-५) टोमाटो, मिक्सर मध्ये ह्याची प्युरी करून घ्या
२ कांदे, बारीक चिरलेले
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
१ चमचा साखर
१ चमचा ओलिव्ह ओईल अथवा बटर
१ चमचा द्रायीड मिक्स्ड हर्ब्स
६ लसूण पाकळ्या, बारीक कुटलेल्या

कृती:

– एका नोन स्टिक भांड्यात बटर किंवा ओलिव्ह ओईल गरम करून, त्यात लसूण, मिरपूड, कांदा गुलाबी होई पर्यंत परतावा. मग त्यात टोमाटो प्युरी घालावी आणि मंद आचेवर शिजवावा. टोमाटो सोस जरा दाट झाले कि त्यात पास्ता, मीठ, साखर, हर्ब्स घालून चांगले मिक्स करावे. सोस ची चव बघून गरज असल्यास मीठ मिरपूड घालून, सर्व्ह करावे.

आहे न किती सोप्पी कृती? मग वाट कसची बघताय – हो जाये?

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

3 Responses to फेत्तुचीन मारीनारा (पास्ता)

  1. Madhuri म्हणतो आहे:

    Khupach chaan idea ahe whole wheat pasta chi 🙂 good one!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s