वदनी कवळ घेता … पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

लहानपणापासूनची सवय : लग्नातल्या पंगतीत बसलं की फक्त ‘पुंडलिक वरदा’ म्हणेस्तोवर धीर धरायचा. एकदा त्या काकांचं ते जोरात म्हणून झालं की मग आपण जेवणावर अगदी अ‍ॅटॅक करायचा…!! एक मात्र आहे, की असं अन्नावर तुटून पडायला आधीच ठरवून ठेवावं लागतं. हल्ला आधी कश्यावर करायचा? जिलबी, लाडू, भजी, श्रीखंड, पुरी, पापड, मिरगुंड, आमटी, की उसळ? (अहो, लग्नात काय काय पक्वान्नं असतात ते आता मी तुम्हाला सांगायला नकोय ! उगीच यादी करता करता मलाच इथे भूक लागायची, काय?!)

सांगण्याच तात्पर्य हे की मी जन्मापासूनच खादाड. हो हो..!! अगदी कुणाला पण विचारून बघा. आमच्या आईला माझ्या लहानपणी अशीच कायम काळजी वाटायची की अमिताला कुणी खाऊची लालूच देऊन कुठे घेऊन तर नाही नं जाणार? आता मला कोण कुठे नेणार? पण आईच ती..!! तिला काळजी वाटायचीच. असो.

आता मी आधीच खादाड आणि त्यातून आमच्या घरी सगळेच तसे खवैय्ये. आमचे आजोबा तर, पैजा लावायचे म्हणे. आणि माझे बाबा हे अजून पण एका खादाड क्लबचे प्राउड मेंबर आहेत.तर नो वंडर की माझ्या खादाडपणाला भरपूर वाव होता. माझी आजी, आई, आत्या, मावशी सगळ्या सुगरणी. आईने कायम सगळं खायला शिकवलं (लावलं..!!) म्हणून मी लसूण पण आवडीने खायला शिकले. (नाही तर आमचे बाबा, अजून लसूण खात नाहीत… शश्श .. असं मी नाही म्हणत बर का!)

पुढे मी साहजिकच आहारशास्त्राचा अभ्यास सुरु केला आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला. आज मी डायेट कौन्सेलिंग करते. पण कायम माझ्या खादाडपणाला माझ्याच आहार शास्त्राचा त्रास व्हायचा. लो कॅलरी – हाय कॅलरीच्या गोंधळात पोळी भाजीचा पण मूड जायचा. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मला इन्फोसिस कंपनीत नोकरी लागली. मग काय विचारता? अमिता पुण्याला एकटी राहायला लागली. स्वतः रोज छान छान जेवण बनवायची आणि खायची. परिणाम: अमिता एका मोठ्या टेंट (तंबू) सारखी दिसायला लागली. आणि तेव्हा तिला अचानक ह्याची जाणीव झाली की मीच नं ती आहारशास्त्रज्ञ?

आणि म्हणून हा ब्लॉग लिहायचं ठरवलं. जशी माझी गत झाली तशी दुसर्‍या कुणाची होऊ नये, म्हणून.

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

7 Responses to वदनी कवळ घेता … पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

 1. Nachiket म्हणतो आहे:

  अमिताबेन..झकास आहे सुरुवात.

  वेलकम टू ब्लॉग वर्ल्ड..

  • amitagadre म्हणतो आहे:

   Thank You.. अर्रर् धन्यवाद. काय अवघड आहे मराठीत टाईप करणं. अगदी गोंधळ उडाला होता पहिली चार वाक्य लिहिताना. आता जरा कम्फर्ट लेव्हल येतीये. हुस्श!

 2. milind म्हणतो आहे:

  Mala tar marathi type karta yetach nahi. Pan masta suruvat kelis bara ka!!!!

 3. Suchita Ambardekar म्हणतो आहे:

  Welcome to khadad club…please no fat free, less oily, only nutrscious stuff…

  I would love to See & read about delicious, butter dripping recipes…
  Truly……

 4. Nachiket म्हणतो आहे:

  butter dripping recipes…

  म्हणजे लोणी तूप वगैरे ज्यातून टपकते किंवा निथळते आहे अशा पाककृति ना?

  व्याडेश्वर..व्याडेश्वर..!!!

  पळा..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s