Bachelor’s चिकन करी

ही चिकन करी ची पाक कृती ऑन डिमांड सादर करत आहे. ह्याला bachelor’s हे विशेषण देण्याचे कारण हे कि ही चिकन करी बनवायला काही पण वाटणे, घोटणे, कालवण करावे लागत नाही. फक्त एक कुकर आणि तो ही नसेल तर एक मोठं भांडं लागतं. तर तुमच्या मित्रांना किंवा (अम्म्म्म … ) मैत्रिणींना impress करायचं असेल तर ही चिकन करी नक्कीच तुमच्या मदतीस येईल.

सामग्री:

४०० – ४५० ग्राम बोनलेस अथवा विथ बोन चिकन
४ कांदे, एकदम बारीक चिरलेले
४ टोमाटो, बारीक चिरलेले
१ इंच आलं, बारीक चिरलेले
१ लसून, बारीक चिरलेला
४ मोठे चमचे तेल
४ चमचे लाल तिखट
१ चमचा दही
मीठ चवीनुसार
१ ग्लास पाणी
३ चमचे meat मसाला

कृती :

– चिकन चांगले धुवून साफ करून घ्या. एक सोप्पा मार्ग म्हणजे hypercity, more सारख्या दुकानातून आधीच साफ केलेले चिकन आणा. मग ह्या चिकन ला दही, १ चमचा मीट मसाला, १ चमचा लाल तिखट आणि एक चमचा मीठ चांगलं कालवून, चिकन ला व्यवस्थित चोळून, त्याला marinade करा.
– मग सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. आल लसून ची तयार पेस्ट (बाजारातली) वापरू नका, त्याच्यातल्या preservative मुळे चिकन ची चव छान लागत नाही.
– कुकर मध्ये अथवा एका भांड्यात तेल गरम करून त्यात आलं लसून आणि कांदा चांगला लाल (almost काळा) होईपर्यंत परता.
– मग त्यात टोमाटो घाला आणि वरून तिखट आणि मसाला व थोडा मीठ घालून, टोमाटो शिजून बारीक होईपर्यंत परता.
– आता चिकन घाला आणि परता.
– आता एक ग्लास पाणी घालून,नीट हलवून कुकर चा झाकण लावा आणि मध्यम आचेवर दोन शिट्या होईस्तोवर शिजवा.
– कुकर च ‘झाकण पडल’ की बघा कसा छान तवांग आलाय चिकन करी वर ते! गरम गरम पोळ्या आणि अशी मस्त चिकन करी- क्या बात हे!

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s