आई ची स्पेशल- भेंडी ची भाजी

हि भेंडी ची भाजी म्हणजे आमच्या आई ची ‘स्पेशल’ कॅटेगरी मधला पदार्थ. नेहमी ची भेंडी ची भाजी म्हणजे नुसतीच भेंडी परतून केलेली, स्पेशल भाजी म्हणजे – कांदा, टोमाटो, आलं आणि लांबट चिरलेली भेंडी. हि भाजी आईच्या खूप खूप मागे लागून मिळायची. आमची आई म्हणजे (अजून पण) केक, लाडू, बटाट्या चा कीस, साबुदाण्याचा चिवडा, करंजी इत्यादी पदार्थ आम्ही खूप हट्ट केला कि मगच करायची. आणि ते आम्ही म्हणायचो तेव्हा हमखास न करता अचानक कधी तरी करून आम्हाला सरप्राईज करायची. इथे भूतकाळ वापरण्या मागचे कारण हे कि आता ते सगळे पदार्थ आम्ही स्वताच आमच्या लहरी प्रमाणे करतो.🙂 पण तरी – आईच्या हातची भेंडी ची भाजी म्हणजे ‘वाह! बढीया’.

सामग्री:
भेंडी- २५० ग्राम, लांबट चिरलेली
टोमाटो- ३, लांबट चिरलेला
कांदा- ३, लांबट चिरलेला
१ इंच आलं- लांबट चिरलेलं
१/२ चमचा- मोहरी
१ मोठा चमचा तेल
१/२ चमचा- साखर
लाल तिखट आणि मीठ चवीनुसार

कृती:
– एका नोन स्टिक कढईत तेल गरम करून, त्यात मोहरी आणि हळद घालून फोडणी करावी. मग त्यात आलं आणि कांदा चांगला गुलाबी होई पर्यंत परतावा.
– आता त्यात टोमाटो घालून परता आणि मग त्यात लाल तिखट आणि मीठ घालून नित मिक्स करा.
– मग भेंडी घालून, नित कालवून त्यावर १/२ मिनिट झाकण ठेवा (झाकण ह्याहून जास्त वेळ ठेवलं तर भाजी ला तार येईल).
– सगळ्यात शेवटी थोडी साखर घालून भेंडी शिजे पर्यंत परत आणि गरम गरम पोळ्या किंवा फुलक्या बरोबर वाढा.

About Amita

Nutritionist, Foodie, New mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s