गोलमाल कटलेट

हि पाककृती म्हणजे एक ‘classified’ सिक्रेट आहे. पण आत्ता पर्यंत हे कटलेट एवढ्या लोकांनी आवडीने खाल्ले आहे कि आता ह्याचं गुपित सांगायला काहीच हरकत नाहीये. हि पाककृती म्हणजे एक saviour आहे. उ.दा. गेला पूर्ण आठवडा आमच्या कडे पाहुणे आणि रिलेटेड फिस्ट चालू आहे. रोज केलेल्या पदार्थातून काही न काही थोड्या फार प्रमाणात उरतं. आणि मग अचानक फ्रीज मधली सगळी जागा गायब होते. अश्या वेळी, हे गोलमाल कटलेट एक उत्तम ब्रेकफास्ट किंवा उपाहार ऑप्शन ठरतं. नेहमीच्या वेगेताब्ले कटलेट ची कृती तर सर्रास मिळते पण हि वेगळी ‘kitchen solution’ कृती करून बघा. आणि हो, सगळ्यांचा खाऊन झालं कि मग ‘guess the ingredients’ चा गेम खेळायला पण मजा येते. 🙂

सामग्री:
एक वाटी किंवा अधिक उरलेला भात
दोन वाट्या उरलेले उपमा/सांजा/पोहे
१/२ वाटी उरलेल्या वर्णाचा गोळा
दोन उकडलेले बटाटे
एक वाटी उरलेली भाजी (कोबी/फ्लॉवर/गाजर/शिमला मिरची)
एक वाटी ब्रेंड क्रंब
तळायला तेल
मीठ आणि काळी मिरी पूड चवीनुसार

कृती:

सर्व जिन्नस (तेल आणि ब्रेड क्रंब वगळून) एका मोठ्या भांड्यात घेऊन निट मळून एक जीव होईल असे कालवा.
जर हे मिक्स सैल झालं असेल तर त्यात अर्धी वाती कॉर्न फ्लोर मिसळून निट कालवा. मिश्रणाची चव घेऊन बघा (हे थोडा अवघड जाईल. मी हा स्टेप श्वास रोखून करते). मग त्याचे एका अंड्या च्या आकाराचे गोळे करा. प्रत्येक गोळ्याला ब्रेंड क्रंब मध्ये घोळवून बाजूला ठेवा. सगळे गोळे अशा प्रकारे तयार झाल्यावर त्याला तेलात मंद आचेवर तळा.
केचप, मायोनेस, हिरवी चटणी- ह्या बरोबर सर्व्ह करा.
ह्या कटलेट ला अजून चविष्ट करायला ह्यात चीज पण किसून घालता येते.

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s