गॉन इन ६० सेकंद्स- लो फॅट पाऊंड केक

हा केक ,माझ्या माहेरी आणि सासरी, एकदम सुपर हिट! हा केक कधीच उरला तर काय असा प्रश्न पडत नाही – कारण केल्या केल्या लगेच त्याचा चट्टा मट्टा होतो. हि रेसिपी ‘Cooking from peasants and their wives’ नावाच्या एका खूप जुन्या पुस्तकातली आहे. ह्या पुस्तकाची डिस्कवरी मला एका रद्दी च्या दुकानात झाली होती. करून बघू म्हणून अगदी पौंड चे ग्राम चे कप असे हिशोब करून मग, पहिल्यांदा हा केक करून बघितला होता. ह्या केक ची ब्युटी त्याच्या versatility मध्ये आहे. एकदा हि बेसिक रेसिपी जमली कि मग त्याचे विविध फ्लेवर्ड वर्जन करता येतात. उ.दा. त्यात लिंबाची साल किसून आणि एक चमचा लिंबाचा रस घालून, लेमन केक तयार होतो. तसाच, ऑरेंज केक पण करता येतो. चोकॉचीप्स घातल्या कि चोकलेट चीप केक झाला. आणि हो, तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव ह्याच्यात थोडे फेरफार करून एक ‘लो फॅट’ वर्झन देत आहे.

सामग्री:

१ १/२ कप मैदा (सेल्फ रेसिंग फ्लौर वापरत असल्यास बेकिंग पाउडर घालू नका)
३/४ कप बारीक साखर/ पिठी साखर/ कॅस्टर शुगर/ जाड साखर (जाडी साखर वापरली तर जास्त वेळ बटर आणि साखर क्रीम करत बसाव लागत)
१०० ग्राम अमूल बटर
३ मोठी अंडी
१ tsp बेकिंग पाउडर
१/४ कप दूध
१ tsp vanilla essence

कृती:
– ओव्हन १८० डिग्री ला प्रिहिट करा.
– सर्व सामग्री रूम टेम्परेचर ला असावे. आधी बटर आणि साखर नीट फेटून घ्या. साखर विरघळून ते एकदम क्रिमी दिसायला लागलं पाहिजे. मग त्यात एक एक अंड घालून फेटा.
– एका वेगळ्या भांड्यात, मैदा आणि बेकिंग पाउडर चाळून घ्या. आता हा मैदा थोडा अंड्याच्या मिश्रणात घाला आणि कालवा. मग दुधात vanilla essence घालून, ते त्या केक च्या मिश्रणात कालवा. उरलेला मैदा घालून स्मूथ मिश्रण तयार करा.
– पाऊंड केक सहसा लोफ टिन मध्ये बेक करतात. पण तुमच्या कडे दुसर्या आकाराचे केक चे भांडे असेल तरी चालेल. पसरट भांड असेल तर केक बेक करायला कमी वेळ लागेल. ज्या भांड्यात केक बेक करायचा आहे त्याला तेल,तूप, किंवा बटर ने ग्रीज करा आणि मग त्यात एक चमचा मैदा घालून तो त्या भांड्याच्या सगळया बाजूला लागेल असे पसरवा. ह्याला बेकिंग टिन प्रीपेर करणे म्हणतात.
– केक चे मिश्रण ह्या टिन मध्ये घालून त्याला १८० डिग्री ला ३०-४० मि बेक करा. पूर्ण घरात केक चा खमंग आणि वनीला चा मस्त वास सुटला कि केक ची ‘done test’ करा. केक च्या मध्य भागी एक सळी (skewer), सुरी घालून त्याला ओलं मिश्रण चिकटत नाही न ते बघा. जर ती सळी एकदम स्वच्छ निघाली, तर केक फस्त करनेको तय्यार!

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

4 Responses to गॉन इन ६० सेकंद्स- लो फॅट पाऊंड केक

  1. kanchan म्हणतो आहे:

    can i use salted amul butter or homemade butter(white butter)

  2. Nachiket म्हणतो आहे:

    nusate daakhavaa aamhaalaa.. X-(

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s