अल्कोहोलिक कॅलोरीस

डिस्क्लेमर १: मद्यपान आपल्या स्वास्थ्या साठी हानिकारक असते. ह्या लेखाचा हेतू – ‘कुठली ड्रिंक घेतलेली चांगली’ हे सांगायचा नसून, ‘कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलोरीस शरीरात वाढतील?’ हे सांगण्याचा आहे. धन्यवाद.

३१ डिसेंबर ची पार्टी. ‘अरे आज मस्त बसू या.. उद्या काय हापिसात सुट्टी. उगीच लवकर उठायचे टेन्शन नाही!‘ ‘आज आम्ही के. पी. ला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफे ला. फुल धमाल.‘ ‘आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमीच त्या बीच रिसोर्ट ला जातो.‘ असे आज बहुतेक लोकांचे पार्टी प्लान्स असतील… म्हणजे आमच्या सारखे नसाल तर. आमच्या ह्यांना प्लानिंग करायला खूप आवडत. पण एक्झिक्युशन ची वेळ आली कि मात्र, ‘अरे, पिझ्झा ऑर्डर करू की!’ 😦 असो. जर तुम्ही teetotaller असाल तर पुढे वाचू नका. नाही ऐकणार? बरं. मग नका म्हणू, ह्या लेखात आम्हाला उपयोगी अस काहीच नव्हतं. (आपण डिस्क्लेमर टाकलेला बरा!)

तर मुद्दा ड्रिंक्स मधल्या कॅलोरीस चा. डायेट वर आहात तर कुठली ड्रिंक घेऊ शकता? कुठलीच नाही. डायेट वर एरवी असतो, आज एक दिवस सूट आहे. तेव्हा जरा ‘लो कॅल लो गिल्ट’ अशी ड्रिंक सांगा न. लो कॅल लो गिल्ट म्हणजे एक स्मॉल पेग रम/व्हिस्की/वोडका/जीन/ब्रांडी आणि पाणी! ह्याहून जास्त काही पण घेतलंत तर ते लो कॅल राहणार नाही!! गिल्ट हा खूप वैयक्तिक विषय आहे, त्यामुळे त्यावर चर्चा इथे नको. काय?

तरी पण, जर कुणाला कॅलोरी कोन्शिय्स होऊन ड्रिंक ची निवड करायची असेल तर हि लिस्ट घ्या. ह्याचा नीट अभ्यास करा आणि मग ठरवा, काय आणि किती घ्यायचं ते. आणि हो, कुठल्या हि मद्यात ‘फॅट’ नसते. मग तरी वजन कसे वाढते? (क्रमशः) आणि हो, लिस्ट जरा तिरपी तार्पी झाली आहे, त्याला वर्ड टेबल मध्ये कॉपी पेस्ट करून इन्सर्ट करण्याचा पेशंस माझ्यात नाही. सॉरी! 🙂

१. ब्रांडी (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
२. जीन (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
३. रम (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
४. वोडका (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
५.व्हिस्की(४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
६.व्हाईट वाईन, ड्राय १ ग्लास (१२० मी ली) ७९ कॅलोरीस
७.रेड वाईन १ ग्लास (१२० मी ली) ८२ कॅलोरीस
८.व्हाईट वाईन,स्पार्कलिंग १ ग्लास (१२० मी ली) ९१ कॅलोरीस
९. व्हाईट वाईन,स्वीट १ ग्लास (१२० मी ली) ११३ कॅलोरीस
१०.बियर,लागर, मायील्ड ३३० मी ली १५० कॅलोरीस
११. बियर, strong ३३० मी ली २२२ कॅलोरीस
१२. रोझे वाईन १ ग्लास (१२० मी ली) २३४ कॅलोरीस

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s