व्हेजिटेबल ऑ ग्रातिन (बेक्ड व्हेजिटेबल इन व्हाईट सॉस) : लो कॅल व्हर्जन

मस्त थंडी म्हणजे मस्त ताज्या विविध भाज्या! आणि असंच ‘किती छान भाज्या मिळतात तर आपण काही तरी भाज्यांचा स्पेशल प्रकार करायला नको’? असं निव्वळ कारण!
म्हणून – बेक्ड व्हेजिटेबलस करायचं ठरवलं. आता नुसत्या बेक्ड भाज्या कुठे चालतायेत? त्या बरोबर कुठलं तरी सॉस पाहिजे. बरं! बार्बेक्यू सॉस चालेल? अम्म्म्म… नको. काही तरी क्रीमी कर न. व्हाईट सॉस? ओह येस! मग काय विचारता- स्वारी एकदम खुश!

व्हेजिटेबल ऑ ग्रातिन ही खूप हॉटेलात मिळणारी डीश आहे. खूपदा ह्यात अननस पण घालतात (नवरतन कोरमा नामक गोड भाजी सारखा). भाज्या बेक करतात आणि त्यावर व्हाईट सॉस आणि चीज घालतात. माझ्या आजे सासू बाईंना ‘ह्यात काही लाल तिखट वगैरे’ घालत नाहीत का असं प्रश्न पडला होता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण मूळ कृतीत लाल तिखट नसते. आणि हो, जसं तुम्हाला माहीतच आहे, मी फारसे ‘भरपूर चीज बटर’ वाले पदार्थ करू शकत नाही (dietician झाले आहे तेव्हा पासून), म्हणून ह्या डीश चे पण लो कॅल लो चीज व्हर्जन देत आहे.

सामग्री:
२-३ मोठे बटाटे, चिरलेले
एक मूठभर फ्रेश/फ्रोझन कॉर्न
१ चमचा बटर
१ कप फरसबी, चिरलेली
१ कप गाजर, चिरलेले
१ कप शिमला मिरची किंवा रेड/येलो पेपर्स
१/२ कप ब्रेड क्रंब
१ क्यूब चीज (तुम्ही हवंतर जास्त पण घालू शकता)

व्हाईट सॉस साठी:
१ मोठा चमचा मैदा
१ १/२ कप गार दूध
१ चमचा बटर
मीठ आणि मिरपूड, चवीनुसार

कृती:
-प्रथम एका बेकिंग डीश मध्ये बटाटे आणि कॉर्न पसरवून त्यावर थोडं मीठ मिरपूड आणि बटर घालून त्याला २० मिनिट १८० डिग्री ओव्हन मध्ये ग्रील मोड वर ठेवावे.
-आता व्हाईट सॉस करून घावे. त्यासाठी, मैदा गार दुधात नीट मिसळून घ्यायचा. एका भांड्यात थोडं बटर गरम करून त्यात मैदा आणि दुधाचे मिश्रण घालून सारखं ढवळत रहायचे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. सॉस जरा दाट झालं (थोडे बुड बुडे आल्यावर) कि मग त्यात मीठ मिरपूड घालून बाजूला ठेवायचे. गोडसर सॉस आवडत असेल तर एक चमचा साखर पण त्यात घालू शकता.
– ओव्हन मधून बेक्ड बटाटा काढून त्यावर बाकी भाज्या घालायच्या. मग त्यावर ते व्हाईट सॉस सगळी कडे सारखे ओतायचे. आता, ब्रेड क्रंब चा एक थर करून सगळ्यात शेवटी किसलेले चीज घालायचे.
– ह्या बेकिंग डीश ला ओव्हन मध्ये २० मिनिट १५० डिग्री वर बेक करून मग ह्या व्हेजिटेबल ऑ ग्रातिन ला गरम गरम खायचे.

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

3 Responses to व्हेजिटेबल ऑ ग्रातिन (बेक्ड व्हेजिटेबल इन व्हाईट सॉस) : लो कॅल व्हर्जन

 1. ajit gadre म्हणतो आहे:

  hi dish , microwave madhe kashi karataa yeil ?–maze kade grill option asalela 1000watt cha micro- oven aahe tya madhe grill+low microw option aahe pan tya karata tya barobar dilele pan vaparave lagate –mi pizzaa tya var karato –ka mi batate,gajar,farasbi, capcicum microw madhe semicook karun ghyavet? aani nantar butter var -tya spl pan madhe fry karun –” bake” karun nantar white sauce+bread crum+cheez che layer banavun parat combo grill karave ka?

  • amitagadre म्हणतो आहे:

   अजित, मायक्रोवेव्ह मध्ये ग्राते करताना आधी भाज्यांना थोड्या बटर मध्ये toss करून ‘मायक्रो हाय’ करा १० मि. मग व्हाईट सोस वेगळे तयार करून, वरून त्या भाज्यांन वर घालून त्याला ‘बेक’ करा, वरचे चीज वितळे पर्यंत.

 2. ajit gadre म्हणतो आहे:

  pl send me your new posts by email—ajit gadre

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s