फॅट फ्री मद्य

सगळेच मद्य मुळात ‘फॅट फ्री’ असते. अगदी खरच! पोर्ट वाईन आणि रोझे वाईन सारख्या काही ड्रिंक्स मधे नेग्लीजीबल प्रमाणात ट्रेस फॅट असते. पण अगदी ‘आहे काय न नाही काय’ असे. मग तरी, सर्व सामान्य समाजाप्रमाणे जी व्यक्ती मद्य पान करतात ती जाड का असतात?
फर्स्ट थिंग्स फर्स्ट: जाडी हा खूप ‘unexclusive’ विषय आहे. अमुक अमुक माणसंच जाड असतात आणि बाकी नाही असे अजिबात नाही. व्हेजिटेरियन, नोन व्हेजिटेरियन, व्हेगन किंवा इंडियन, अमेरिकन, ओस्त्रेलीयन ई. कुणी पण जाड असू शकत किंवा जाड होऊ शकत. कारण जाडी हि ९५% कॅलोरी इन्टेक वर अवलंबून असते. उरलेले ५% हे होर्मोन्ल प्रोब्लेम किंवा जेनेटिक कारणा मुळे असू शकते.

तरी पण आपण खूपदा ऐकतो – ‘बियर बंद करा म्हणजे जाडी कमी होयील’, ‘दारवा पिऊन पिऊन पोट किती सुटलंय बघा कि आधी’ वगेरे. फक्त बियर मुळे पोट सुटतं का? नाही. फक्त मद्य पान करून माणूस जाड होतो का? अजिबात नाही. (उलट, लिव्हर कायम चे काम करणं बंद होऊन वजन कमीच होते 😦 ) मग होतं तरी काय ती बियर प्यायल्या वर?

कुठल्या हि मद्यात इथेनॉल असते जो एक अल्कोहोल (केमिकल नाव) चा प्रकार आहे. एरवी आपण काही पण खाल्लं कि आपल शरीर लगेच त्याचे पचन सुरु करते आणि अन्नातल्या ग्लुकोज/ carbohydrates (शर्करा) , फॅट (चरबी), प्रोटीन ला अब्सोर्ब करत आणि जर ह्या पैकी कुठला हि पदार्थ गरजे पेक्षा जास्त प्रमाणात असेल (खाल्लं असेल) तर त्याचे ‘फॅट’ किंवा चरबी मधे रुपांतर होवून त्याचे थर आपल्या शरीरावर जमा होत राहतात. माणसाचं वजन वाढणे हि पण एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. असे एका रात्रीत कोणी १० किलो वजन वाढवू शकत नाही. जेव्हा आपण महिनोन महिने अश्या प्रकारे गर्जे पेक्षा जास्त खात राहतो तेव्हा आपण जाड होतो.

तर मग, अल्कोहोल च्या बाबतीत काय घडतं? समजा तुम्ही बियर पिताय (फक्त समजा!!) आणि त्या बरोबर फ्रेंच फ्रायीस किंवा काजू खाताय (कुठला हि चकाणा ). अश्या वेळी, त्या चकाणा च्या कॅलोरी अब्सोर्ब व्हायच्या आधी अल्कोहोल च्या कॅलोरीस अब्सोर्ब होऊन वापरल्या जातात. म्हणजे, तुम्ही जो चकाणा खाल्लात त्या सगळ्या एक्स्ट्राकॅलोरीस होतात. आणि शिवाय, एका मायील्ड बियर पाईंट मधे साधारण १५० कॅलोरीस असतात. तुम्हीच सांगा फक्त एक पाईंट बियर कोण पितंय? जरी व्हिस्की, वोडका पीत असलात तरी त्यात मिक्स करता त्या जूस, कोला ई. मधे पण भरपूर कॅलोरी असतात. ड्रिंक्स घेताना कॅलोरीस चा हिशोब ठेवणं खूप अवघड होतं, आणि म्हणून ‘अल्कोहोल कॅलोरीस’ खूप जास्त प्रमाणात शरीरात वाढतात. तर एकूण तुमच्या प्येयाचा उष्मांक बराच वाढल्या मुळे तुमचे वजन वाढते.

पण मग त्या ‘बियर बेली’ चं काय? २५+ वर्षाच्या पुरुष किंवा स्त्री दोघांच्या शरीरात एक्सेस चरबी जमा होण्याचा ठिकाण म्हणजे ‘abdomen’ (पोट). स्त्रियांच्या शरीरात हिप्स वर पण पुष्कळ प्रमाणात चरबी जमा होण्याची tendency असते. जेव्हा अल्कोहोल मधून मिळणाऱ्या कॅलोरीस वाढतात तेव्हा त्या सर्व चरबी बनून जाडी वाढवतात. अजून एक महत्वाची बाब म्हणजे, चकाणा! चकाणा म्हणून आपण किती कॅलोरी रिच पदार्थ खातो. चीज, फ्रेंच फ्रायीस, काजू, खारे दाणे, चीझ्लिंग, चीज बॉल, फ्राईड चिकन, फिश, सॉसेज … आज हि यादी पूर्ण करून होणार नाही, म्हणून इथेच थांबते. 🙂 ह्या पदार्थांचा दुसरा प्रोब्लेम म्हणजे, ड्रिंक्स सारखंच आपण नेमकं किती (!!) खाल्लं ह्याचा अंदाज लावणं खूपच अवघड असत.

Moral of the story: अल्कोहोल नी वजन वाढतं पण त्याच्यात फॅट किंवा साखर असते म्हणून नाही तर त्याच्यातून मिळणाऱ्या अल्कोहोलिक कॅलोरीस खूप असतात आणि जोडीला असलेला चकाणा पण त्या आगीत तेल तुपाचं काम करत म्हणून.

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s