पंजाबी चिकन करी

कालच केली होती ही चिकन करी. सगळे तुडुंब जेवले आणि मग ४ तास झोप ताणून दिली. आणि संडे साजरा झाला! असो. हि चिकन करी करायला जरा जास्त वेळ लागतो म्हणजे bachelor चिकन करी एवढी सोपी कृती नाहीये कारण ह्यात मसाला वाटून घ्यायला लागतो. पण डेफिनेटली वर्थ द एफर्ट!

सामग्री व कृती:

७५० ग्रॅम ते १ किलो चिकन
१ मोठा चमचा दही
१ चमचा हळद
२ तमालपत्र
३ बडी इलायची
१/२ चमचा मीठ

– चिकन स्वच्छ धुवून त्याला दही, हळद आणि मीठ चोळून लावावे. मग एका कुकर च्या भांड्यात हे चिकन आणि तमालपत्र व बडी इलायची घालून कुकर मध्ये (३ शिट्ट्या) शिजवून घ्यावे. भांड्यात पाणी घालायची गरज नाही.

एका नॉन स्टिक भांड्यात, १ मोठा चमचा तूप आणि एक मोठा चमचा तेल गरम करावे. त्यात २ चमचे जिरं, ५ लवंगा, २ दालचिनी, ४ कोरड्या लाल मिरच्या, ६ मिरे, २ तमालपत्र, २ बडी इलायची, १ चमचा आलं लसूण पेस्ट, आणि ५ मोठे कांदे (चिरलेले) घालावे. कांदा चांगला लालसर परतला गेला कि त्यात २-३ चमचे लाल तिखट, २ चमचे देग्गी मिर्च पावडर घालून अगदी लाल होई पर्यंत परतावे. मग ह्यात ४ टोमाटो बारीक चिरून घालावे आणि ते शिजून कांदा टोमाटो एकजीव होयीस तोवर परतावे. हवी असल्यास १ चमचा साखर घालावी म्हणजे टोमाटो चा आंबट पण कमी होतो. बडी इलायची आणि तमालपत्र बाजूला काढून ठेवावे.
आता हा कांदा टोमाटो मसाला थोडा गार झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावा.

परत मसाला ज्यात परतला त्या भांड्यात एक चमचा तेल घालून, त्यावर वाटलेला मसाला घालून परतावा. आता २ कप थंडगार पाणी ह्यात घालून उकळी आणायची. गार पाणी घातल्याने लाल तवंग छान येतो (खूप तेल घालावे लागत नाही). आता ह्या रस्स्यात शिजलेले चिकन आणि त्याचे पाणी घालावे. करी ला चांगली उकळू द्यावी. आपल्याया हवी तेवढी दाट झाली कि गरम गरम पोळ्यान बरोबर सर्व्ह करावी.

एव्हाना घरातल्या सर्व माणसांच्या भूका मसाल्याच्या मस्त वासानी खवळलेल्या असतीलच.. त्यामुळे, पानात वाढता क्षणी ह्यावर सगळे तुटून पडणार ह्याची खात्री!

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

One Response to पंजाबी चिकन करी

  1. पिंगबॅक Tweets that mention पंजाबी चिकन करी | खादाड क्लब -- Topsy.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s