डबल चॉकलेट चॉकलेट चिप मफिन्स

सामग्री:
२ अंडी
१ १/२ कप गव्हाचे पीठ (किंवा मैदा)
१०० ग्राम बटर
१ कप साखर (डायेट शुगर पण वापरू शकता)
१/४ कप चॉकलेट चिप
१/४ कप कोको
१/४ कप दूध
१ चमचा बेकिंग पावडर
१ चमचा सोडा
१ चमचा व्हेनीला इसेन्स

मफिन्स आणि केक मधला मोठा फरक म्हणजे त्याला बनवण्याची पद्धत. केक किंवा कप केक बनवताना आधी लोणी आणि साखर क्रीम करून मग त्यात एक एक अंड घालून सगळ्यात शेवटी मैदा घालतात. मफिन्स करताना क्विक ब्रेड मेथड वापरतात. म्हणजे सर्व ओली सामग्री एका बाउल मध्ये मिक्स करायची आणि सर्व कोरडी सामग्री वेगळ्या बाउल मध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि मग ओल्या सामग्री च्या भांड्यात, मैद्याचे मिक्स घालून, नित फेटून त्याला बेक करायचे.

ह्या मफिन्स मध्ये कोको आणि चोकलेट चिप्स दोन्हीचा वापर केल्या मूळे ह्याचे नाव – डबल चॉकलेट चॉकलेट चिप मफिन्स असे आहे. मफिन्स चे साचे नसतील तर ह्याला केक च्या भांड्यात पण बेक करता येते.

तर सोप्प आहे. अंडी, बटर, दूध आणि व्हेनीला इसेन्स एका भांड्यात चांगल मिसळून घ्या. मग दुसर्या भांड्यात गव्हाचे पीठ किंवा मैदा, कोको, बेकिंग पावडर, सोडा, चॉकलेट चिप, साखर असे नीट कालवून घ्या. आता ओल्या मिश्रणात कोरडे जिन्नस थोडं थोडं घालून नीट एकजीव होईपर्यंत कालवा. मफिन्स किंवा कप केक च्या साच्यात ह्याला बेक करा. १८० डिग्री ओव्हन टेम्प्रेचर वर २०-२५ मि लागतील.

About Amita

Nutritionist, Foodie, New mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s