होम मेड होल व्हीट पिझ्झा

हि रेसिपी स्पेशल आहे. कारण ह्यात पिझ्झा बेस पण घरी आपल्या रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठातून (होल व्हीट फ्लॉर) बनवला आहे.

पिझ्झा बेस साठी :

३ कप गव्हाचे पीठ
१ १/२ मोठे चमचे ड्राय यीस्ट
१ चमचा मीठ
१ चमचा साखर
१ कप कोमट पाणी
१ चमचा तेल

– यीस्ट आणि साखर कोमट पाण्यात विरघळवून त्याला १५ – २० मि बाजूला ठेवा थोडा फेस येईपर्यंत.
– गव्हाच्या पिठात मीठ, तेल आणि यीस्ट चे मिश्रण घालून त्याची सैल कणिक भिजवा. वाटल्यास थोडं अजून पाणी घाला.
– आता ह्या कणकेला एका मोठ्या भांड्यात घालून त्याला प्लास्टिक wrap किंवा ओल्या रुमालानी झाकून ठेवा. हे भांड घरातल्या जरा ऊब असलेल्या जागी ठेवावे म्हणजे यीस्ट ची प्रक्रिया लौकर होईल.
– एका तासाभर नंतर ती कणिक साधारण दुप्पट अशी फुलेल. मग त्याला परत नित मळून पुन्हा आणि एक तास झाकून ठेवा.
– एका अल्युमिनियम च्या ट्रे ला तेल लावा. फुललेल्या कणकेचे ५ गोळे करा. प्रत्येक गोळा हातानी थालीपीठ थापतो तसे थापून त्या ट्रे मध्ये २० मि १८० डिग्री वर बेक करून घ्या. पिझ्झा बेस तयार झाला.

पिझ्झा सॉस आणि टोपिंग साठी:

५ टोमाटो ची पेस्ट (मिक्सर मध्ये वाटून घ्या)
२ चमचे देग्गी मिर्च पावडर
१ चमचा साखर
मीठ आणि मिरीपूड चवीनुसार
हवे असल्यास हर्ब्स

– ह्या सर्व सामग्री ला एका सॉस pan मधे दाट होईपर्यंत शिजवा. हे सॉस छान दाट आणि लाल होईल.

पिझ्झा बेस वर सर्व प्रथम पिझ्झा सॉस पसरवा. मग वरून शिमला मिर्च, मशरूम, पनीर, बेबी कॉर्न, कांद्याची पात इ. पसरवा. शेवटी वरून पिझ्झा चीज किसून घाला (हवे तेवढे) आणि पिझ्झा १० मि चीज वितळे पर्यंत बेक करा.

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

4 Responses to होम मेड होल व्हीट पिझ्झा

 1. sunil fatangare म्हणतो आहे:

  छान आहे मी ट्राय केला आहे

 2. suvarna म्हणतो आहे:

  jar oven nasel tar kasa karaycha.

 3. kanchan म्हणतो आहे:

  chan aahe,tyar pizza bes vaparayala nako vate(myadya aastona} ha chan aahe gharguti aani aarogyadai.
  Thank you.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s