एग हाक्का नूडल्स

एशियन पदार्थ, बाकी युरोपिअन किंवा अमेरिकन पदार्थांपेक्षा जास्त आरोग्यपूर्ण असतात. तसाच एक पदार्थ म्हणजे घरी केलेल्या stir fried noodles/vegetables. घरी केलेल्या हे महत्वा चे कारण आपल्या कडे सर्रास मिळणारं ठेल्या वरचं ‘इंडिअन चायनीज’ हे बर्यापैकी तेलकट असतं. पण हेच जर आपण घरी केलं तर एक healthy पदार्थ बनू शकतो.

१ पाकीट हाक्का नूडल्स (बोईल करून घेतलेल्या)
१ कांदा, लांबट बारीक चिरलेला (कांद्याची पात पण वापरू शकता)
२ शिमला मिरची, बारीक चिरलेली
२ कप बारीक चिरलेला कोबी
२ चमचे आलं लसूण पेस्ट
२ हिरव्या मिरच्या, लांबट चिरलेल्या
१ चमचा तेल
१ मोठा चमचा सॉय सॉस
चवीनुसार मीठ
२ अंडी (एग नूडल्स करायच्या असतील तर. तसेच चिकन चे बारीक बोनलेस तुकडे किंवा कोलंबी पण घालू शकता)

कृती:

नूडल्स उकळत असताना एकी कडे भाज्या चिरून घ्या म्हणजे वेळ वाचतो. नूडल्स मिठाच्या पाण्यात उकळा शिजे पर्यंत आणि मग एका गाळण्यात किंवा रोळीत गाळून त्यावर थंड गार पाणी ओता म्हणजे त्या चिकटणार नाहीत आणि मोकळ्या होतील.
एका मोठ्या कढई मध्ये, मोठ्या आचेवर तेल गरम करा. त्यात पटापट आला लसूण पेस्ट, कांदा घाला आणि भरभर परता. मग कोबी आणि शिमला मिर्च घालून परता. जर एग नूडल्स करायच्या असतील तर gas बारीक करून सर्व भाज्यांना कढई च्या एका बाजूला सारा आणि रिकाम्या जागी दोन अंडी फोडून त्याची नुसतीच भुर्जी करा. अंड शिजलं कि बाकी भाज्यांबरोबर नित कालवा. चिकन कोलंबी घालायची असेल तर आता घालून ते शिजेस्तोवर परता. आता ह्यात नूडल्स, मीठ, सोया सॉस घालून मोठ्या आचेवर २ मि परता आणि गरमागरम सर्व्ह करा.

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

One Response to एग हाक्का नूडल्स

  1. महेंद्र म्हणतो आहे:

    Looks Delicious &Yummy..
    But unfortunately i am not self imposed restrictions as per Rujuta’s book . 😦 BTW, could reduce 9 kg in one and half month 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s