मेला मैदा

‘आईईई…. प्लीईज्ज्ज… पिझ्झा कर न…किंवा नूडल्स .. पास्ता? तो पण नाही? मग नुसतं sandwich तरी कर न मग? असं काय? आम्ही काही पण करायला सांगितलं की तू नाहीच म्हणते! maggi पण नाही खाऊ देत. पिंकी ची आई तिला दररोज maggi किंवा ब्रेड बटर देते.’
आमची आई: काय ते सगळे नुसते मेले मैदे खायचे असतात तुम्हाला! दूध पोळी खा पाहू मुकाट्याने!

हा आमच्या लहानपणचा कायमचा संवाद. आमच्या आई ला हे माहित होतं की मैदा खाल्लेला चांगला नाही, त्यात काहीच जीवन सत्व नसतात असं ती आम्हाला सांगायची. पण जीवन सत्व म्हणजे काय? मैद्यात ती नसतात तर त्यात एवढा काय बिघडलं? किंवा मैद्यात ती का नसतात? अश्या प्रश्नांचं कधी फारसं समाधानकारक उत्तर आम्हाला (मला आणि माझ्या बहिणीला – त्यात ‘पण का?’ हा प्रश्न विचारण्यात मी पटाईत) मिळालं नाही. असो.

गव्हाच्या पिठात, गव्हाच्या सालात आणि wheat germ म्हणजे गव्हाच्या सगळ्यात आतला भाग ह्यात असलेले, विटामिन (जीवनसत्व), मिनरल आणि फायबर असतात. म्हणूनच साध्या गव्हाच्या पिठाला होल मील फ्लोर पण म्हणतात. मैदा हे प्रोसेस केलेलं गव्हाचा पीठ असतं. प्रोसेसिंग मध्ये त्यातलं wheat bran आणि wheat germ काढून टाकतात. त्यामुळे मैद्यात फक्त स्टार्च असतो. परदेशात गेले काही वर्ष ऑल पर्पज फ्लोर म्हणजे मैदा केमिकल विटामिन आणि मिनरल fortified मिळतो. पण हे केमिकल जीवनसत्व आपल्या शरीरात खूप कमी प्रमाणात शोषले जातात. गेल्या ५० वर्षात पूर्ण विश्वभरात आलेला मेदोवृध्धी चा पूर ह्याला मैद्याचे आहारात वाढलेले प्रमाण आणि घरी स्वयंपाक न करण्याची वाढलेली प्रथा (आशिया खंडात तरी बऱयाच प्रमाणात घरी स्वयंपाक करतात) , पुष्कळ प्रमाणात कारणीभूत आहे.

पण मग प्रश्न असं पडतो की जर खरंच मैद्यात nutrients नसतात (स्टार्च सोडून) तर मग त्याला प्रोसेस तरी कशाला करतात? कारण wheat germ मधे असलेल्या ओईल मुळे, त्याची शेल्फ लाईफ खूप कमी असते. गिरणीतून आणलेले पीठ जर प्रोसेस न करता ठेवले तर ते ३०-४० दिवसात खराब व्हायला सुरुवात होते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे कि industrial production मधे शेतातून शेल्फापर्यंत गहू packaged पिठाच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचायला कमीत कमी २ महिने लागतात. तुलनेत प्रोसेस केलेल्या मैद्याची शेल्फ लाईफ पण जास्त असते. तर मग साहजिकच फूड इंडस्ट्री मधे मैदा जास्त वापरला जाऊन त्याचेच प्रोडक्ट ते आपल्या समोर आणणार.

आपल्या लहानपणी, हल्ली असतात तसे, हेल्थ फूड चे पर्याय पण नव्हते. आता हे so called ‘हेल्थ फूड्स’ पण कितपत खरंच आरोग्यवर्धक असतात हे पुन्हा कधीतरी! तर, मैदा आपल्या आहारातून अगदी बाद करायची आवश्यकता नाही पण शक्यतो आठोड्यातून एकदाच मैद्या चा किंवा मैदा असलेला पदार्थ करावा किंवा खावा.

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s