बेक्ड पोटॅटो वेजेस

म्हणजे ‘बटाट्याच्या भाजलेल्या काचऱ्या’?
मी: काय हे? अगदी कचरा केलास रे वेजेस चा! पोटॅटो वेजेस म्हंटल की कसा मस्त भारदस्त स्टायलिश आयटम वाटतो!

पण खरं ते इथे मान्य करायला हरकत नाही – पोटॅटो वेजेस म्हणजे भाजलेल्या बटाट्याच्या काचऱ्या. ह्यांनी जरी त्याचं देसी नामकरण केलं असलं तरी पदार्थ असतो लई फक्कड! आणि करायला कित्ती कित्ती सोपा! फक्त बटाटे, लाल तिखट, मीठ आणि थोडं तेल- एवढाच जिन्नस सुद्धा पुरतो. मी मात्र इथे ‘गार्लीकी वेजेस’ ची पाक्रु देतीये बरं का! असं काय? मला माझं वेगळेपण दाखवायला नको? 🙂

सामग्री:

बटाटे : हवे तेवढे (मी ४ घेतले), स्वच्छ धुवून (एखाद्या जुन्या टूथ ब्रश ने घासून), पुसून कोरडे करून – त्याचे वेजेस करा (लांबट चिरा), सालं काढू नका (त्याने वेजेस अधिक कुरकुरीत होतात शिवाज त्यातील पौष्टिकता टिकून राहते )
१ मोठा चमचा तेल : कुठले पण (मी उगीच ओलिव्ह ओईल वापरले, चवीत फारसा फरक पडत नाही. त्यामुळे ‘स्वस्त ते मस्त’ वापर!)
१ चमचा किंवा अधिक : लाल तिखट
काळी मिरीपूड आणि मीठ चवीनुसार
हवे असल्यास ओरेगानो घाला
६ -८ पाकळ्या लसूण, बारीक किसून. विकतची तयार पेस्ट घालण्याचा विचार देखील मनात येऊ देऊ नका (त्याच्यातल्या व्हिनेगर ने वेजेस एकदम बंडल लागतात)

कृती:

– सर्व सामग्री एका बेकिंग दिश मधे घेऊन हाताने व्यवस्थित कालवा. सगळ्या बटाट्याला मसाला नीट लागला पाहिजे.
– मग ओव्हन ला टोस्ट मोड (दोन्ही रॉड तापतील असे) २५० डिग्री वर चालू करून त्यात ती बेकिंग डिश २५ मिनिटे ठेवा.
-अगदीच राहावेनसं झालं की मग हळूच ओव्हन उघडून (जपून) एका चिमट्याने एक वेज काढून, फुंकर मारून खाऊन बघा. अप्रतिम कुरकुरीत आणि चमचमीत वाटला म्हणजे वेजेस तयार आहेत. नाही तर थोडं वेळ अजून ओव्हन मधे ठेवा. आणि हो, ज्यांनी कोणी हे वेजेस करण्याचे कष्ट घेतले असतील त्यांनी आधीच किमान १/४ ऐवज स्वतासाठी वेगळा काढून ठेवावा. सगळ्यानसमोर ठेवलं कि ५ मिनिटात चट्टा मट्टा होतो.
– ४ बटाट्यांचे वेजेस नाही न पुरले? म्हणूनच मी हवे तेवढे (झेपतील एवढे) बटाटे घ्या असे लिहिले आहे! 😉

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

One Response to बेक्ड पोटॅटो वेजेस

  1. kanchan म्हणतो आहे:

    sopy aani chavadar.chan.
    aavdaly .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s