साखर आणि फॅट चे खरे गुपित

‘आहो, मधुमेह झालाय न? सगळी साखर बंद करा!’ ‘ मी सध्या काही गोड किंवा तळलेले पदार्थ खात नाही- वजन कमी करायला हो!’ ‘उत्कृष्ट आरोग्याची गुरुकिल्ली- कुठलाही स्वरूपात साखर टाळणे’.

हे आणि असे अजून बरेच समज/गैरसमज- साखर, तूप, तेल, वनस्पती, फॅट – विषयी आपण वाचून किंवा ऐकून असतो. आपल्याला जमेल तेवढं आपण आरोग्य जपण्याचा आणि आहारात फेरफरक करण्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा आपण अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीला बळी जातो. उ.दा. शुगर फ्री चॉक्लेट. ह्या चॉक्लेट मधे पांढरी साखर कमी प्रमाणात असते पण त्या ऐवजी रासायनिक स्वीट्नर आणि नेहमीच्या चॉक्लेट पेक्षा जास्त प्रमाणात फॅट असते – कारण जर काहीच बदल केला नाही तर ते चॉक्लेट चविष्ट लागणार नाही. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी तर ह्या शुगर फ्री पदार्थांपासून लांबच राहावे कारण ‘शुगर फ्री’ म्हंटल की आपोआप एक लहान तुकडा खाण्या ऐवजी, अर्धं किंवा पूर्ण चॉक्लेट खाणं होतं आणि अश्यावेळी त्या चॉक्लेट मधल्या साखरेपेक्षा त्यातील फॅट जास्त हानिकारक ठरतं.

असंच काही बटर/क्रीम च्या वापरात पण होतं. बटर मधून खूप फॅट मिळतं म्हणून ते टाळायला हल्ली लोकं ‘नॉन-डेरी लो फॅट’ बटर आणतात. आता हे बटर म्हणजे लोण्याचा अंश कमी करून, त्यात तेलाचा वापर करून, त्यावर भरपूर रासायनिक प्रक्रिया करून त्या तेलाचे बटर सारख्या लागणाऱ्या पदार्थात रूपांतर करतात. त्यामुळे त्यातील सॅच्युरेटेड फॅट जरी (नावाला) कमी झाले तरी एकूण फॅट कमी होत नसते. दुसरं म्हणजे – ‘जास्त बटर नको’ म्हणून कमी किंवा बटर न खाणारे व्यक्ती ‘अरे हे लो फॅट बटर आहे’ असं म्हणून नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात ते खातात. आणि मग म्हणतात – ‘मी तर काहीच हाय कॅलरी खात नाही, तरी माझं वजन कमी होत नाही’. म्हणून आज तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या खाद्य पदार्थात लपून बसलेली साखर, फॅट आणि तत्सम पदार्थ कसे शोधायचे, हे सांगते.

१००% किंवा त्याहून थोडंच कमी फॅट असलेले पदार्थ
लोणी, बटर, तेल, तूप, डालडा, लो फॅट बटर किंवा ब्रेड स्प्रेड, मार्जरीन, मेयोनेझ, रेडी मेड सलाड ड्रेसिंग

खूप जास्त प्रमाणात फॅट असलेले पदार्थ
बीफ, पोर्क, बदकाचे मांस, चीझ, म्हशीचे दूध, क्रीम, साय, मलई पनीर, तेल युक्त दाणे, पीनट बटर, चॉक्लेट, नारळाचे दूध/पावडर, टोफू, बकरीचे मांस, हॉट डॉग, सॉसेज, सलामी, बेकन, रेडी मेड कबाब ई.

साखर व त्याची ‘टोपणनावे’ ( कुठल्याही पदार्थात हे घटक पहिल्या तीन घटकांमध्ये लिहिलेले असतील, तर ते पदार्थ हेल्दी नाहीत असे समजावे)
शुगर, शुगर सोलीड्स, डेक्स्ट्रोझ, सुक्रोज, कॉर्न स्वीट्नर, कॉर्न स्टार्च (२ मिनिट नूडल्स मधे असतो), हाय फ्रक्तोज कॉर्न सिरप (एच. एफ. सी. एस) (हे फ्रूट ज्यूस, सोफ्ट ड्रिंक मधे असते), गोल्डन सिरप (हे बेकरीत वापरतात), लिक्विड ग्लुकोज, माल्टोडेक्स्ट्रीन ( हे ग्रनोला बार मधे असते), कॉर्न सिरप, मध, मेपल सिरप

नेहमीच्या पदार्थात लपलेले फॅट
– केक, बिस्कीट, कुकीज, मफिन्स, पफ, पेस्ट्री, पॅटीस
– फ्रोजन योघर्ट आणि आईस्क्रीम
– फ्रायीड किंवा बेक्ड स्नॅक्स किंवा चिप्स
– रेडी-टू ईट फ्रोझन पदार्थ.

म्हणून माझा नेहमी आग्रह असतो की घरच्या, पारंपारिक स्वयंपाका सारखा दुसरं आरोग्यपूर्ण पर्याय नाही.

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s