अती गुट्गुटीत बाळ म्हणजे सुदृढ बाळ?

तुम्हाला काही वर्षांपूर्वी ‘बेबी फूड्स’ च्या सारख्या दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती आठवतात? त्यातली सगळी बाळं अगदी गोबरी आणि गुट्गुटीत असायची. नशीब की आता त्या जाहिराती दाखवत नाही! पण त्यावरून एक लक्षात यायला हरकत नाही, की मुळात आपल्या देशात गुट्गुटीत म्हणजे सुदृढ असे समजले जात होते; आणि आजही आपले बाळ ‘चबी’ नसलं तर बऱ्याच बायकांना वाईट वाटतं. कुठलं हि साधारण बारीक वाटेल असं लहान मुल किंवा बाळ बघितलं की आधी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘तुमची मुलगी/मुलगा नीट खात नाही का?’ ह्या प्रश्नाचं जर उत्तर ‘व्यवस्थित सगळं खाते’ असं दिलं तर लगेच पुढचा उद्गार – ‘अरेच्या! बघून तरी असं वाटत नाही.’ असं ऐकल्यावर उगीच त्या आई वडिलांच्या मनात शंकेचा किडा वळवळून जातो.

तसेच वयोमानाप्रमाणे वजन जास्त असलेल्या मुलाला ‘काय, बघूनच कळतं न कि चांगल्या खात्या-पित्या घरचा आहे ते?’ असं म्हणून त्याचे कौतुक केले जाते. पुढे जाऊन त्याच मुलाला शाळेत ‘लट्ठपणाच्या’ विकट परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आपला मुलगा/ मुलगी कुठल्याही खेळात भाग घेत नाही, दिवसभरात त्याचा काहीच व्यायाम होत नाही, हि गोष्ट लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. लहानपणी ज्या गोब्रेपणाचे कौतुक होत होते त्यालाच आता लट्ठपणाचे लेबल लागल्यामुळे मुलं पण गोंधळात पडतात. प्रौढांमध्ये वाढणाऱ्या लट्ठपणा प्रमाणेच, आज आपल्या देशात लहान मुलांमध्ये वाढत्या जाडी चा गंभीर प्रश्न आढळतोय. माझ्या मतानुसार ही समस्या जास्त निकडीची आहे कारण बालपणी अति लट्ठ असलेली बहुतांश लोकं, मोठेपणी पण स्वताच वजन आटोक्यात ठेवायला धडपडत असतात.

ह्या सगळ्याची सुरुवात गर्भारपणात होते. गर्भवती ने जर गरजेपेक्षा जास्त आणि अती तळलेले, तूपकट, गोड किंवा जंक फूड खाऊन तिचे वजन १५-२० किलो किंवा त्याहून अधिक वाढले तर गर्भातल्या शिशूच्या पण चरबीच्या पेशी अतिरिक्त प्रमाणात वाढतात. तसेच बाळाला स्तनपान न करता जर फॉर्म्युला फूड किंवा बेबी फूड दिले तर त्यात पण बाळाच्या पोटात आवश्यकतेपेक्षा अधिक कॅलरी जाण्याचा धोका असतो. ह्यामागचे कारण म्हणजे- सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त पावडर घालून बेबी फूड तयार करणे किंवा ‘लहान बाळाची भूक खूप असते आणि ते जेवढं खाईल तेवढं सुदृढ होईल’ ह्या धोरणा खाली, त्याला अति खायला प्रोत्साहित करणे. गुट्गुटीत बाळाला अधिक प्रमाणात गोड खिरी, गूळ घातलेले गोड पदार्थ, साखर घालून म्हशीचे दूध ई. पदार्थ जास्त खायला घालून त्याच्या वाढत्या वयात शरीरातल्या फॅट साठवून ठेवणाऱ्या पेशींचा आकडा खूप वाढतो आणि नंतर ह्याच पेशी जास्त प्रमाणात शरीरात चरबी साठवतात.

‘माझ्या नातीला प्रचंड गोड आवडतं’ म्हणून वरचेवर लाडू पेढे शिरा खायला देणं किंवा आई बाबा हॉटेल मधे गेल्यावर तिथे मुलाला फ्रेंच फ्राईज, चीझ, चिप्स, आईस्क्रीम खायला देणं- दोन्ही सवयी त्या लहान मुलासाठी तितक्याच हानिकारक असतात. ३-७ वर्षाच्या वयोगटातली मुलं आई वडिलांच्या खाण्या पिण्याच्या सवयींचे अनुकरण करतात आणि त्याच सवयी त्यांना कायम स्वरूपी अवगत होतात. दर रविवारी सकाळी इन्स्टन्ट नूडल्स, दुपारी गोड धोड आणि रात्री हॉटेल मधे जेवायची सवय जर आई बाबांना असेल आणि ती सवय घरात लहान मुल आल्यावर त्यांनी बदलली नसेल, तर मुलाची पण ‘रविवारी असंच खायचं असतं’ अशी समजूत होणार आणि तो पण कायम तसच खात राहणार. असे न होऊ देता, अगदी बालपणापासूनच तुमच्या मुलाला (किंवा मुलीला) आरोग्यपूर्ण आणि प्रमाणात खायची सवय लावा आणि त्याचे लट्ठपणा नामक राक्षसापासून संरक्षण करा.

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to अती गुट्गुटीत बाळ म्हणजे सुदृढ बाळ?

  1. jaya म्हणतो आहे:

    majh bal 18 mahinyache aahe te dharun ubhe rahato. aadharala dharun chalato. pan bina aadharacha ubha rahanyacha prayant karato. pan aajun mokala chalat nahi . aapalya botala dharun chalato. mi kay karu upay sanga

  2. Priyanka desale म्हणतो आहे:

    Maz bal 15 mahinyanch ahe pn ti 3 4 mahinan pasun kahich khat nahi ti biscuits pn nahiavdt tila pej pn thodi far khate te sodun kahi khat nahi tila 2 dat alet tich wajn 9 kg ahe ti kahi bhat kiva kahi hi khav tya sathi mla kshi sanga

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s