पुरुषांना अनिमिया? कसं शक्य आहे?

असा वाद श्री. दीक्षित (वय ४५) माझ्याशी घालत होते. त्यांना हल्ली वरचेवर थकवा, दम लागणे, अती झोप येणे,मळमळणे , भूक न लागणे अश्या लक्षणांचा अनुभव होतो. दीक्षितांना कायम हेल्दी उपक्रम करण्याचा नाद होता. म्हणून ते घरचा सगळा स्वयंपाक ओलिव्ह ओईल मधे करायला लावायचे, आठवड्यातून दोनदा व्हिटामिन च्या गोळ्या घ्यायचे, अगदी मोजून मापून खायचे आणि गेल्याच महिन्यात त्यांना व्हिटामिन बी-१२ ची उणीव असल्याचे शंका आली म्हणून त्यांनी त्याची पण इंजेक्शन घेतली होती- पण तरी काही फरक पडला नाही. त्यांचा रोजचा आहार असा होता-
उठल्याबरोबर- चहा
ब्रेकफास्ट- कॉर्न फ्लेक्स (१ वाटी), दूध आणि एक कप लेमन टी
दुपारचे जेवण- दोन फुलके, थोडी भाजी
दुपारी- लेमन टी आणि बिस्किटे
संध्याकाळी घरी गेल्यावर- लेमन टी
रात्री- कढी आणि खिचडी (२ वाट्या)

ते मला विचारती होते कि ते- तळलेलं, तूपकट, गोड, जंक फूड, प्रोसेस्ड फूड असं काहीच खात नाहीत; कोलेस्ट्रोल वाढेल ह्या भीतीने अंड आणि मांसाहार बंद केला आहे आणि ओलिव्ह ओईल वापरूनच स्वयंपाक करतात (सांगण्याचे तात्पर्य कि ते अगदी हेल्दी वागतात, तरी!) – तरी पण त्यांना आपण तंदुरुस्त असल्यासारखे वाटत नव्हते. हे कसे? त्यांचा वृत्तांत ऐकून मी त्यांना त्यांचे हिमोग्लोबिन किती आहे असं विचारताच त्यांनी मला स्पष्ट सांगितलं- ‘आहो, पुरुषांना कधी अनिमिया (रक्तक्षय) होतो का? काही पण काय म्हणताय.’ मी त्यांना, हिमोग्लोबिन चा रिपोर्ट घेऊन या मग बोलू, असं सांगून घरी पाठवलं. एका आठवड्यानी ते पुन्हा मला भेटायला आले, त्यांचा रिपोर्ट घेऊन. त्यांना आपले हिमोग्लोबिन कमी असून (९ ग्रॅम/ १०० मी ली ) आपल्याला अनिमिया आहे- ह्याचा भयंकर कमीपणा वाटत होता. कारण, त्यांच्या मते हा विकार फक्त बायकांना होत असे. स्वतःला ‘सेल्फ मेड आहार शास्त्रज्ञ’ म्हणवून घेणारे दीक्षित आज अनिमिक झाले होते, आणि हे त्यांच्या लक्षात पण आलं नव्हतं- ह्या विचाराने अजून लाजिरवाणे झाले होते. असो.

अनिमिया चा सगळ्यात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे लोह्तत्वाची उणीव असल्यामुळे होणारा रक्तक्षय (आयर्न डेफिश्यन्सी अनिमिया). हा विकार बायकांमध्ये, विशेषतः पौगंडावस्थेत आणि गर्भारपणात आढळतो. पण हल्लीच्या प्रोसेस्ड, पॉलिश्ड आणि इन्स्टन्ट फूड च्या जमान्यात- अनिमिया हा अगदी सहजासहजी कुणाला पण होऊ शकतो. खास करून, आपण जाड होऊ- या भीतीने अति कमी आहार घेणाऱ्यांना.
आता दिक्षितांचाच आहारक्रम बघा कि- दिवसभरात ते ४-५ कप चहा (लेमन टी) पीत होते. चहात असलेलं टॅनीन , अन्नातल्या आयर्नची पचनप्रक्रिया मंद करते. तसेच, सकाळी घेत असलेल्या आयर्न फॉर्टिफायीड कॉर्न फ्लेक्स चे पण होते. दुधात असलेल्या कॅल्शियम मुळे लोह्तात्व शोषून घेतले जात नाही. कॉर्न फ्लेक्स आणि दूध असं एकत्र खालले कि त्या कॉर्न फ्लेक्स मधले आयर्न शोषले जात नाही. पुरुषांना रोज १० मिलीग्राम आणि स्त्रियांना रोज १५ मिलीग्राम लोह्तात्व आहारातून मिळण्याची आवश्यकता असते. जर दीर्घकाळ एवढं लोह्तात्व मिळालं नाही तर अनिमिया होऊन नंतर औषधरूपात आयर्न फॉलिक अ‍ॅसीड च्या गोळ्या घ्याव्या लागतात. प्रौढावस्थेत एकूण कुपोषणामुळे हा विकार होण्याची शक्यता असते. दीक्षितांच बघा न, एका प्रौढ माणसाच्या मानानं त्यांचा आहार खूप कमी होता. त्यातून फळं , लिंबू, पालेभाज्या आणि दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश अति अल्प. साहजिकच त्यांना एवढं अशक्तपणा जाणवत होता.

दीक्षितांना मी सुचवलेला आहार-

सकाळी- चहा
ब्रेकफास्ट च्या अर्धा तास आधी- १ कप दूध
ब्रेकफास्ट- १ १/२ वाटी पोहे/उपमा (वरून लिंबू पिळून) , १ फळ
जेवण- २ पोळ्या, आमटी, भाजी, भात
दुपारी- चहा
संध्याकाळी- मिसळ/ओली भेल
रात्री- २ पोळ्या, भाजी, खिचडी आणि कोशिंबीर
अधून मधून अंड, चिकन व मासे पण खाऊन लोह्तात्व मिळतं. पदार्थांवर लिंबू पिळून खाल्ल्याने त्यातील लोह्तात्व शरीरात पटकन शोषले जाते. २-३ कप हून अधिक चहा पिणे किंवा खाण्याबरोबर चहा पिणे टाळावे. अनिमिया टाळायला फक्त लोह्तात्वाच नाही तर आहारात प्रथिनांचे व फॉलिक अ‍ॅसीड चे पण प्रमाण वाढवावे लागते.

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s