‘हल्ली मी नवीन प्रयोग सुरु केलाय…’

काय? तुम्ही कधी कोणाचे नवीन डाएट प्रयोग नाही ऐकलेत? तुमच्या ओळखीत कोणीच जाड,
अति सडपातळ, मधुमेही किंवा हेल्थ कॉन्शियस नाहीत का? मला तर हमखास सगळे
त्यांच्या नवीन आहार प्रयोगांबद्दल सांगतात आणि प्रत्येकाला त्यांचा प्रयोग
किती वैज्ञानिक आहे हे मला पटवून द्यायचं असतं. हा माझ्या व्यवसाया मुळे
उत्पन्न झालेला धोका पण असू शकतो. असो. आज मी तुम्हाला अश्याच काही
प्रयोगांबद्दल सांगणार आहे, अर्थात ज्यांनी कोणी मला हे प्रयोग/स्वानुभव
सांगितले त्यांना मी त्यांचा तर्क कसा चुकीचा आहे हे सांगून पण पटलं असेल
ह्याची मला खात्री नाहीये, कारण अश्या व्यक्तींचा काही काळ (म्हणजे प्रयोग
निरर्थक आहे हे लक्षात येई पर्यंत) तरी त्यांच्या त्या नवीन उपक्रमावर अगाध
श्रद्धा असते.

– दुधी/कोरफड/कारलं ई. रस सकाळी निर्ष्या पोटी पिणे:
हे फॅड गेल्या बऱ्याच वर्षांपासून टिकून आहे. हल्ली तर औषधांच्या दुकानात पण
असे रस/ज्युस डबाबंद मिळतात. मागे मी समजावल्या प्रमाणे, कुठल्याही ज्युस मधून
साखर वगळता इतर काही पोषण मिळत नाही. आणि जे लोकं वरील ज्युस पिऊन आमचं १० किलो
वजन कमी झालं किंवा तत्सम दावा करतात त्यांचा रोजचा आहार पण निश्चित आधी पेक्षा
त्यांनी कमी केलेला असतो. कारण कॅलरी कमी केल्या शिवाय वजन कायम स्वरूपी कमी
होतंच नाही.

– झिरो फॅट मील :
हा तसा अलीकडेच प्रसिद्ध झालेला प्रयोग आहे. ह्यात दिवसातलं एकदाचं खाणं फॅट
फ्री असण्याचा आग्रह असतो. पण त्यात मग लोकं काही पण ‘फॅट फ्री’ म्हणून खपवतात.
उ.दा. उकडलेला दलिया व त्यात भाज्या, दही, चाट मसाला, जिरं मिरची असं करून
खाणं. किंवा फक्त दह्यातली कोशिंबीर करून खाणे. असं करणाऱ्यांचा हा समज असतो कि
फोडणी घातली नाही म्हणजे पदार्थ फॅट फ्री झालं. पण आहो, त्या दह्यातल्या आणि
दलियात (नगण्य) असलेल्या फॅट चे काय? शिवाय आपल्या शरीरातल्या पाचक रसात सर्व
प्रकार चे अन्न पचवण्याचे रसायन असतात, फॅट सुद्धा. त्यामुळे असं कुठलं पोषक
तत्व वगळून जेवणं हानिकारक ठरतं. उगीच जेवणाच्या वेळी असे भलतेच पदार्थ खायचे
आणि मग दुपारच्या चहा बरोबर खारी, नान खटाई आणि चकल्या/चिवडा चापायचा. हे कसलं
डाएट?

– तेल मालिश आणि स्टीम बाथ (सौना):

कोणाला नाही आवड्णार आरामात मालिश करून घेत पडून रहायला आणि असच आरामात काही कष्ट न घेता वजन कमी करायला? मला पण आवडेल, असं खरंच होत असतं तर! पण मालिश करून फ़क्त एकाच व्यक्तिला व्यायाम मिळतो – मालिश करून देणाऱ्याला!! आपल्याला मिळतो तो फक्त आराम – सोबत रक्त भिसरण वाढणे आणि शिथिल झालेली त्वचा थोडी टवटवीत होणे असे पण परिणाम दिसतात, पण वजन मात्र ‘जैसे थे’ राहते.
दूसरा प्रकार म्हणजे एका खोलीत बसून / झोपून भरपूर घामाघूम होण्याचा. त्या स्टीम बाथ (सौना) मधे घाम पुष्कळ गाळला जातो आणि त्या मुळे लगेच अर्धा ते दोन किलो वजन पण कमी झालेले काट्यावर दिसते; पण थोड्या वेळाने घरी जाऊन पाणी प्यायलात जेवलात कि वजन पूर्ववत होते. ह्या प्रकारात वरचेवर ‘डीहायड्रेशन’ होऊन काही काळानंतर त्या व्यक्तींना ‘किडनी स्टोन’ होण्याचा धोका असतो.

मी समजू शकते कि आहारावर नियंत्रण ठेवणं आणि व्यायाम करणं ह्या खूप धीर आणि मनोबल लागणाऱ्या गोष्टी आहेत; पण काय करणार? जेवढी मेह्नात वजन वाढायला लागलेली असते, तेवढेच परिश्रम ते कमी करायला पण घ्यावेच लागणार. आरोग्याला सांभाळण्याचा काही शॉर्ट कट नसतो!

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s